NCB चौकशीचे डिटेल्स लिक कसे होतात?
मुंबई, दि. 26 सप्टेंबर:
अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणी चौकशी सुरु असताना ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीनं या प्रकरणात बॉलिवूडमधील काही बड्या स्टार्सची नावं समोर आली. दररोज नविन नाव समोर येत आहे पण चौकशी सुरु असताना मिनिटा-मिनिटाला माहिती बाहेर ये आहे. यावर काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी शंका व्यक्त केली आहे.
सचिन सावंत म्हणतात की, ”एनसीबी कार्यालयात काय घडतंय याची मिनिटा-मिनिटाची माहिती प्रसार माध्यमांवर सांगितली जात आहे. एनसीबीकडून या सर्व गोष्टींचे खंडण व्हायला हवे. जर असे झाले नाहीतर असे समजले जाईल की, एनसीबीकडून मुद्दाम माहिती दिली जात आहे. हे खरं असेल तर अत्यंत वाईट आहे” या आशयाचे ट्विट सावंत यांनी केले आहे.
एनसीबीकडून दीपिका पदूकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची आज चौकशी सुरु असताना चौकशी मध्ये नेमकं काय सुरु आहे याची माहिती प्रसार माध्यमांकडून दाखवली जात आहे. दाखवल्या जाणाऱ्या माहितीबाबत सचिन सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
एनसीबीच्या एकूण चौकशीवरच सावंत यांनी दोन दिवसा पूर्वीच गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. जुन्या WhatsApp चॅटवरून ही चौकशी केली जात आहे तर मग कंगणा स्वतः ड्रग घेत होती असं तिनेच कबुल केलं आहे. तीचे व्हीडीओ सुद्धा आहेत असं असताना एनसीबी कंगणा ची चौकशी का करत नाही. 50 ग्रॅम गांजावरून एवढा मोठा तमाशा करणारे एनसीबी कर्नाटकात भाजपा कार्यकर्त्याकडे 1200 किलो गांजा सापडला त्याच्याकडे एनसीबी का पहात नाही, असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला होता.
