भारत पाकिस्तान मधील युद्ध थांबले पण..!

0
india_pakistan_ceasefire-768x432.jpg

भारत पाकिस्तान मधील युद्ध थांबले पण..!

नवी दिल्ली, दि. १० मे २५ ;

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळाला आहे. संध्याकाळी ५ वाजल्यापासून दोन्ही देशात शस्त्रसंधी लागू होत असल्याचे जाहीर करण्यात आले. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर ही शस्त्र संधी करण्यात आली.

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशात तणाव होता आणि यातूनच भारताने ७ मे रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हल्ले सुरू झाले होते अखेर या हल्लेखोरीला आज युद्ध विराम मिळाला आहे.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. पाकिस्तानकडून 3.35 वाजता अधिकृपणे फोन आल्यानंतरच भारताने शस्त्रसंधी निर्णयाची घोषणा केली आणि पाकिस्तान नरमल्यानंतर भारताकडून अधिकृतपणे युद्धविरामची घोषणा करण्यात आली आहे”.

शस्त्र संधी झाली असली तरी पाकिस्तान काही सुधारत नाही असे दिसते. शस्त्र संधीची घोषणा होऊन दोन तास होताच पाकिस्तानने सीमेवरील भागात हल्ले सुरू केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *