भारताचा इस्लामाबादवर हल्ला, कराची बंदरही उद्ध्वस्त.

0
Pak Attack India

भारताचा इस्लामाबादवर हल्ला, कराची बंदरही उद्ध्वस्त..

नवी दिल्ली, दि. ९ मे २०२५:

पहलगामचा बदला घेत भारताने पाकिस्तानवर तुफान हल्ले सुरु केले आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवित पाकिस्तानच्या हद्दीत घूसून हल्ले केले. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, कराची, बहावलपूर, चकवाल रावलपिंडी, घोटकी अट्टोक अशा 13 शहरांमध्ये स्फोट करण्यात आले. लाहोरच्या विमानतळाजवळही स्फोट करण्यात आले.पाकिस्तानच्या शहरांमध्ये भारतीय सैन्याने धमाके केले आहेत. भारत पाकिस्तानात युद्धाचा भडका उडाला आहे. पाकिस्तान सर्वत्र युद्धाचा सायरन व भीतीने पळापळ सुरु आहे.

इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानात घुसून पहिल्यांदा ९ ठिकाणी हल्ले केले. भारताच्या या हल्ल्यानंतर लाहोर आणि सियालकोट विमानतळ बंद करण्यात आले. भारतीय सैन्य पाकिस्तानच्या प्रत्येक इराद्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पाकिस्तानची दोन जेएफ १७ व एक एफ १६ विमाने भारताने पाडली, एस ४०० ने ७०० ड्रोन्स व ८ क्षेपणास्त्रे पाडली, पाकिस्तानची AWACS एअर सिस्टिम नष्ट केली. पाकिस्तानच्या ९ शहरांवर भारताने हल्ले करून पाकिस्तानचे कंबरडे मोडले. कराची बंदरावर भारतीय नौसेनेने हल्ला चढवत बंदर उद्ध्वस्थ केले. भारताच्या हल्लाने पाकिस्तान भयभीत झाला आहे. पाकिस्तानवरील हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे.

पाकिस्तानने जम्मूच्या आरएसपुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये घुसखोरी करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी तो हाणून पाडला. पाकिस्तानकडून पठाणकोट एअरबेसवरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. पण भारतीय हवाई सुरक्षा प्रणालीने तोही निष्फळ ठरवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *