IMG-20250417-WA0146

ED कारवाईवरून काँग्रेस आक्रमक.

मुंबई, दि. १७ एप्रिल २०१५

मोदी सरकारकडून सुरु असलेल्या ED च्या गैरवापराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील इंडिया बुल्स जवळ आंदोलन केले. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे.

या आंदोलनात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, काँग्रेसे वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. रजनीताई पाटील, खा. प्रणिती शिंदे, खा. श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री अॅड. यशमोती ठाकूर, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, डॉ. विश्वजीत कदम, खा. डॉ. कल्याण काळे, खा. रविंद्र चव्हाण, खा. नामदेव किरसान, खा. बळवंत वानखेडे, खा. डॉ. शोभा बच्छाव, खा. डॉ. शिवाजी काळगे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, यु. बी. व्यंकटेश, आ. भाई जगताप, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, माजी खा. हुसेन दलवाई, माजी आ. राहुल बोंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष प्रशासन व संघटन ऍड. गणेश पाटील, मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, रामचंद्र दळवी, ब्रीज दत्त, अभिजीत सपकाळ, श्रीरंग बर्गे, सचिव अजिंक्य देसाई, विश्वजीत हाप्पे, यशपाल भिंगे, आनंद सिंह, सुभाष पाखरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *