MIDC अंधेरी मुख्यालयाच्या पुनर्विकासाची निविदा आधीच फिक्स!
MIDC अंधेरी मुख्यालयाच्या पुनर्विकासाची निविदा आधीच फिक्स!
मुंबई, दि. १ एप्रिल २०२५;
एमआयडीसी अंधेरी मुख्यालयाच्या पुनर्विकासाचे काम एकाच कंपनीला द्यायचे भाजपा युती सरकारने आधीच ठरवले आहे असा गंभीर आरोप करत भाजपा युती सरकारच्या काळात निविदा निष्पक्ष पध्दतीने काढल्या जात नाहीत हे वास्तव आहे असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
यांसदंर्भात एक्सवर प्रतिक्रिया देताना सचिन सांवत पुढे म्हणतात की, कॅपासाईट इंफ्राप्रोजेक्टस या कंपनीलाच एमआयडीसी मुख्यालयाच्या पुनर्विकासाचे काम मिळणार अशी व्यूहरचना झाली आहे. २६ मार्चला निविदा उघडण्यात येणार होती. तीन कंपन्यांनी त्यात भाग घेऊनही शेवटच्या क्षणी अंदाजात बदल करण्याचे एक छोटेसे कारण देऊन, बोली २ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. या अगोदरही ही निविदा २५ नोव्हेंबरला उघडण्यात येणार होती परंतु त्यावेळी २६ मार्च तारीख देण्यात आली. कार्टेलायझेशनला सहमती देणाऱ्या निवडक काही लोकांनाच पात्र ठरेल याची खात्री करण्यासाठी पुणे आधारित वॉर ग्रुपसह एक अनिवार्य सामंजस्य करार करण्यात आला आहे. असे नसेल तर प्लानिंग ऑथोरिटी असलेल्या एमआयडीसीला स्वतःच्या मुख्यालयाचे प्लानिंग चार चार महिने करता येत नाही का? असा प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
समुद्राचे पाणी गोड करण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रकल्पात निविदा कोणाला मिळावी यासाठी लॉबींग करणारा श्रीरामाचा पुजारी (SB) इथेही सक्रिय आहे असे कळते. त्याला अर्धा किलो प्रसाद मिळणार व इतर कोणाला दीड किलो मिळणार हे ठरले आहे असे इतर कंत्राटदार सा़ंगत आहेत असेही सावंत म्हणाले.
