नववर्ष राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देवो..

0
20250330_103401

नववर्ष राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देवो

मुंबई, दि. -३१ मार्च :-

वसंतऋतूच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा हा नवचैतन्य, नवनिर्मिती, नवउत्साह, नवसंकल्पांचा सण आहे. मराठी नववर्षाच्या या मंगलप्रसंगी मराठी माणसांच्या समस्त महाराष्ट्रवासीयांच्या जीवनात सुखसमृद्धी, भरभराट, आरोग्य, आनंद नांदो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा एक महत्वपूर्ण सण आहे. घरोघरी गुढी उभारून आणि गावातून-शहरातून शोभायात्रांचे आयोजन करून मराठी माणूस हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. हे मराठी नववर्ष राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देवो, सामाजिक ऐक्य आणि बंधुत्व अधिक दृढ होवो. नव्या संकल्पांनी प्रेरित होऊन आपण सर्वजण महाराष्ट्राच्या विकासासाठी एकजुटीने योगदान देऊया. आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीच्या माध्यमातून महाराष्ट्र अधिक बळकट, समृध्द, संपन्न करूया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *