औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक.

0
IMG-20250316-WA0216

औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक.

रत्नागिरी, दि. १६ मार्च २५;

औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे, ते शौर्य पुसून टाकायचे षडयंत्र आहे. औरंगजेबाचे उदात्तिकरण कोणीच करू नये पण भाजपा स्पॉन्सरच त्याचे उदातिकरण करत आहेत असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

सपकाळ पुढे म्हणाले की, औरंगजेब हा क्रूर शासक होता, त्याने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकले, भावाचा खून केला, लहान भावाला वेडे ठरवले. या क्रूरकर्मा औरंगजेबाला मराठी माणसाने या मातीत गाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आम्हाला प्रमाण आहे पण भाजपाला शिवाजी महाराजांचा इतिहास व शौर्य पुसून टाकायचे आहे म्हणून एक प्रवृत्ती औरंगजेबाची कबर उखडून टाका असे सांगत आहे सपकाळ यांनी हल्लाबोल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *