मढीच्या मुस्लिम दुकानदारांना काँग्रेसचा विश्वास ‘डरो मत’!

0
IMG-20250307-WA0283

मढीच्या मुस्लिम दुकानदारांना काँग्रेसचा विश्वास ‘डरो मत’!

अहिल्यानगर, दि, ७ मार्च २०२५
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची थोर परंपरा आहे. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच वागावे अशी आपली शिकवण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची लढाई ही केवळ सत्तापरिवर्तनासाठी नाही तर व्यवस्था परिवर्तनासाठीही होती, स्वातंत्र्यानंतर देश संविधानाने चालत आला पण आज केंद्र व राज्यातील सरकार हे संविधान विरोधी असून ब्रिटिशांप्रमाणे फोडा व राज्य करा ही या सरकारची निती आहे. सत्ताकारणीसाठी जाती जातीत समाजात विभाजन करून त्यांना एकमेकांविरोधात उभे केले जात आहे त्यामुळे सद्भावना सौहार्दाची पुर्नस्थापना करण्यासाठी काँग्रेस पक्ष सद्भावना पदयात्रा काढत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

सद्भावना यात्रेला सुरुवात करण्याआधी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज आदर्श ग्राम हिवरे बाजार येथे भेट दिली. सरपंच पोपटराव पवार यांच्याकडून गावाच्या विकासाची माहिती घेतली. ग्रामीण विकासाबरोबरच शहराचा विकास करताना सर्वांना बरोबर घेऊन विकास करणे महत्वाचे आहे असेही सपकाळ म्हणाले. त्यानंतर मढी येथे कानिफनाथांच्या समाधीचे, भगवानगड येथे संत श्री. भगवानबाबांच्या समाधीचे आणि नारायणगड येथे भगवान नगद नारायणाचे दर्शन घेऊन सामाजिक एकोप्यासाठी साकडे घातले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी येथे कानिफनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले व तेथील दुकानदारांची भेट घेऊन चर्चा केली.काही दिवसांपूर्वी मढीच्या ग्रामपंचायतीने एक बेकायदेशीर ठराव करून मढीच्या यात्रेत मुस्लीम समाजाच्या दुकानदारांना दुकाने लावण्याची परवानगी देणार नाही असे म्हटल्याचे व सत्ताधारी पक्षातील मंत्र्याने या असंवैधानिक आणि बेकायदेशीर ठरावाचे समर्थन केले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आज या दुकानदारांशी चर्चा करून आपण घाबरू नये, काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी आहे असा विश्वास दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *