corona 22

मुंबई, दि. २४ सप्टेंबर २०२०:

कोरोना काळात पोलीस दल हे योद्ध्यांसारखे कार्यरत राहिले आणि थेट जनतेच्या संपर्कात यावे लागत असल्याने त्यांनाही कोरोनाची लागण मोठ्या संख्येने झाली. दुर्दैवाने या कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातील २३५ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. यात २३ अधिकारी आणि २१२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

दिलासादायक बाब म्हणजे १८ हजार ३७२ पोलिसांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या राज्यात २१ हजार ९८८ पोलिस करोना पॉझिटिव्ह आहेत. त्यात २, ३९८ अधिकारी व १९ हजार ५९० पोलिस कर्मचारी असल्याची माहिती आहे.

मुंबई पोलिसांत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना करोनाची बाधा झाली असून त्यांच्या संपर्कात आलेले कनिष्ठ अधिकारी यांनाही विलगीकरणात जावे लागले आहे.

कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत असताना विविध शासकीय विभागाचे मोठे योगदान राहिले आहे त्यात वैद्यकीय व्यवसायातील अधिकारी कर्मचारी यांच्याबरोबर पोलीस दलाचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. अनलॉकची प्रकिया सुरू झाल्यानंतर अनेक नियम शिथील करण्यात आलेत. त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांची गर्दीही वाढत चालली आहे. या परिस्थीतीत पोलिसांवर अधिक भार आहे. पोलिस दलाला कोरोनाची वाढती लागण ही चिंतेची बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *