पु.ल. देशपांडे म्हणजे राज्याचा हॅपी नेस इंडेक्स.

0
images (88)

पु.ल. देशपांडे म्हणजे राज्याचा हॅपी नेस इंडेक्स.

मुंबई, दि. ३ मार्च २५; –

महाराष्ट्राचा हॅप्पीनेस इंडेक्स म्हणून पु. ल. देशपांडे यांचे कार्य असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भर त्यांनी घातली आहे. त्यांच्या विनोदबुद्धी आणि भाषाशैली तसेच त्यांच्या साहित्यातून मिळणारा आनंद निखळ होता असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

यावेळी ते पुढे म्हणाले की, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मराठी कलाकारांचे तसेच रसिकाचे योगदान मोठे असून संगीत क्षेत्रात लता मंगेशकर, भीमसेन जोशी, आशा भोसले, नाटक आणि सिनेमा क्षेत्रात श्रीराम लागू, निळू फुले तर साहित्य क्षेत्रात वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, त्याचबरोबर लोककला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी पोवाड्यातून मोठे योगदान दिले आहे. संस्कृती आणि सभ्यता यांचे मूल्यमापन त्याठिकाणी जोपासल्या गेलेल्या साहित्य, संस्कृती आणि भाषेमुळे होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मराठी माणसाने नाटकाप्रती आपले प्रेम जोपासले आहे. नाटकाचे अनेक प्रयोग होतात, देशात या क्षेत्रात मराठी कलावंतांचे काम महत्त्वाचे आहे. गायक, कवी, साहित्यिक, कवी आदी सगळ्यानी आपली कला, साहित्य, संस्कृती याचे जतन करून आपल्या लोकांचे जीवन समृद्ध केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पु.ल.अकादमी सारख्या वस्तू भविष्यात राज्यात तयार होतील. रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाला साजेशे काम इथे झालेले आहे. मात्र, हे सातत्य पुढे टिकले पाहिजे. अशी अपेक्षा मुखमंत्री फडणवीस व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *