बाजार समितीने शेतकऱ्यांना सोई सुविधा द्याव्या. 

0
20250225_151337

बाजार समितीने शेतकऱ्यांना सोई सुविधा द्याव्या.

पुणे, दि. २५ फेब्रुवारी;

शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासोबतच त्यांच्या शेतमालाला संरक्षण देण्याकरिता विविध सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम कृषी उत्पन्न बाजार समितीने करावे, असे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री केल्यानंतर शाश्वती वाटली पाहिजे. शेतकरी विश्वासाने माल विक्री करतात ते विक्री व्यवस्थेवर अवलंबून असतात. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. व्यापाऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी करणे, त्यांच्याकडून आवश्यकतेनुसार अनामत रक्कम घेणे, खरेदी-विक्री व्यवहाराची माहिती, कर्जफेडीची क्षमता आदीबाबत पणन विभागाने अभ्यास करावा.

शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रीय शेती करण्यावर भर दिला पाहिजे. कृषी क्षेत्रात विविध उपक्रमशील प्रयोग करण्यात येत असून त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल यादृष्टीने काम केले पाहिजे. शेतकरी चांगल्या प्रतीच्या शेतमालाचे उत्पादन करीत असतात, त्यांची जनजागृती केली पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यात शेतकरी विक्री केंद्रे उभारणी केले पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर्शनी भागात मोठ्या आकाराचा एलईडी शेतमालाचे भाव, कृषी विषयक योजनांची माहिती, पर्जन्यमान, हवामान अंदाज आदींबाबत माहिती प्रकाशित करण्यात यावी.

राज्यात विविध ठिकाणी कृषी विभागाच्या जागेबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात येणाऱ्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. शेतकरी प्रगतशील असून त्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देण्यासोबतच त्यांच्या मनातील अस्थिरता कमी करण्याकरिता कृषी व पणन विभागाच्या समन्वयाने येत्या काळात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येईल, असेही ॲड. कोकाटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *