नीलम गोऱ्हेंनी तसे भाष्य केले नसते तर योग्य झाले असते!

0
20241123_091914

नीलम गोऱ्हेंनी तसे भाष्य केले नसते तर योग्य झाले असते!

मुंबई दि. २४ फेब्रुवारी;

साहित्य संमेलनातील नीलम गो-हे यांच्या विधानावर शरद पवार यांनी भूमिका केली आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नीलम गोऱ्हेंनी तसे भाष्य केले नसते तर योग्य झालं असते, संजय राऊत जे बोलले ते 100 टक्के योग्य आहे. नीलम गोऱ्हे यांनी हा वाद निर्माण करण्याची काही गरज नव्हती. नको त्या गोष्टी सांगण्याची गरज नव्हती असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, नीलम गोऱ्हे यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत काम केले त्यानंतर त्या राष्ट्रवादीत आल्या नंतर त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या. आता त्या शिंदेंच्या नेतृत्वात काम करत आहेत. एवढ्या मर्यादित कालावधीत चार पक्ष बदलले. त्यांनी स्वतःचा अनुभव लक्षात घेता असे भाष्य करायला नको होते. त्या संबंधात संजय राऊत जे म्हणाले ते योग्य आहे

साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो त्यामुळे त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर त्यावर माझा काही आक्षेप नाही. पण साहित्य संमेलनाचा वापर राजकारणासाठी होतोय हे मात्र खरं नाही. ग्रंथ दिंडीत कोणीही राजकीय नव्हते. उद्घाटनात पंतप्रधान मोदी, मी आणि फडणवीस होते. दुसऱ्या सत्रात शिंदे होते. महत्त्वाचा कार्यक्रम होता. तिसरी मुलाखत मराठी पाऊल पडते पुढे यात एकही राजकीय नव्हते. मनमोकळा संवादात ज्ञानेश्वर उबाळे होते. राजदीप सरदेसाई होते. मंजिरी वैद्य या कार्यक्रमात होते. यातही कोणी राजकीय नव्हते. त्यानंतरच्या परिसंवादातही राजकीय नव्हते. लोकसाहित्य ते भैरवी यात संवादातही राजकारणी नव्हते.साहित्य संमेलनाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी माफी मागितली त्यामुळे मी म्हटलं की पडदा टाका असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *