मराठा समाज आक्रमक, १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद!

0
Maratha res

कोल्हापूर, दि. २४ सप्टेंबर :
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी करत १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. कोल्हापूरच्या मराठा गोलमेज परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या गोलमेज परिषदेला राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. गोलमेज परिषदेचे आमंत्रक आणि मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी लोकसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव न मांडल्यास राज्यातील ४८ खासदारांचे पुतळे जाळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच १ ऑक्टोबरनंतर राज्यातील १८१ आमदारांचे पुतळे जाळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा बांधव नाराज झाले आहेत. मराठा समाजातर्फे राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. बुधवारी कोल्हापूर शहरात राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गोलमेज परिषदेत एकूण १५ ठराव सर्व सहमतीने मांडण्यात आले.

गोलमेज परिषदेतील १५ ठराव…
मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मराठा समाजाच्या मुलामुलींचे चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी. सारथी संस्थेला १००० कोटींची आर्थिक तरतूद करावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १००० कोटींची तरतूद करावी. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे. स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करावी. असे ठराव करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *