बॉलिवूड-ड्रग कनेक्शनमध्ये टाॅप स्टार्स!

0
20200923_232012

मुंबई दि २३ सप्टेंबर:

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक यांचा अमली पदार्थांशी संबंध समोर आल्यानंतर बाॅलिवूड आणि ड्रग कनेक्शनची चर्चा सुरू झाली. यातूनच एनसीबीने काही ड्रग पेडलरची चौकशी केली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने बाॅलिवूड मधील काही बड्या अभिनेत्रींवर लक्ष केंद्रित केले होते.

एनसीबीने आता या प्रकरणात स्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रित सिंह आणि श्रद्धा कपूर यांना समन्स बजावले आहे. दीपिकाची मॅनेजर करिष्मा, डिझायनर सिमोन खंबाटा आणि सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर जया साहा हिने अमली पदार्थविरोधी पथकाकडून होणाऱ्या चौकशीत मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन सीबीडी ऑईल मागवल्याची कबुली जयाने दिली. सुशांतच्या फार्म हाऊसमध्ये पार्ट्या होत होत्या या पार्ट्यांना कोण कोण येत होते याची माहिती सुशांत च्या फार्म हाऊसवर या अभिनेत्रींना बोटीने सोडणा-या व्यक्तीनेही काही अभिनेत्रींची नावे घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *