दिल्लीचे अभिषेक शर्मा शिंदेसेनेचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक.
दिल्लीचे अभिषेक शर्मा शिंदेसेनेचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक.
मुंबई, दि ३१ जानेवारी :-
नवी दिल्ली येथील प्रसिद्ध उद्योगपती अभिषेक शर्मा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुक्तागिरी बंगल्यावर जाऊन भेट घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिंदे यांनी त्यांची नियुक्ती पक्षाचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक (निवडणूक आणि युती) या पदी केली. तसे नियुक्तीपत्र शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेनेचे आसाम राज्यप्रमुख आणि नॉर्थ ईस्ट प्रभारी परमिंदरसिंह मनचंदा हेदेखील उपस्थित होते.
