भ्रष्टाचार, दादागिरी, हफ्तेखोरीच्या मुद्द्यावर अमित शाहांना भेटणार.
भ्रष्टाचार, दादागिरी, हफ्तेखोरीच्या मुद्द्यावर अमित शाहांना भेटणार.
पुणे दि. ३० जानेवारी ;
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या 51 दिवसांपासून फरार आहे. तो कुठे आहे. त्याच्या तपासाचे काय झाले याचं उत्तर राज्य सरकारने द्यायला हवं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे कागदपत्रे दिली आहेत. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार गप्प बसणार नाहीत. भ्रष्टाचार, दादागिरी, हफ्तेखोरीच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून संसदेत मोठ्या ताकदीने हा विषय मांडणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, बीड मध्ये पीकविमा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर पिक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे आहेत. या घोटाळ्याबाबची कबुली कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिली. हा घोटाळा आधीच्या काळात झाला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या घोटाळ्याची संपूर्ण माहिती राज्य सरकारकडे आहे. पीकविमा आणि हार्वेस्टर घोटाळा कुठे कुठे झाला आहे. याची सर्व माहिती राज्य सरकारकडे आहे ती त्यांनी समोर आणावी. त्यांचं पुढं काय झालं याबाबत सरकारने उत्तर द्यायला हवं. आमदार सुरेश धस यांनी बोगस बिलांबाबत सांगितलं आहे त्यामुळे आता त्यांनी नैतिकतेवर राजीनामा द्यायला हवा. अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
अंजली दमानियांनी केलेल्या आरोपावर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री निर्णय घेतील असे सांगितले आहे. या ऑफिस ऑफ प्रॉफिट आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते मी पाहणार आहे. सुरेश धस यांनी केलेल्या आरोपावर काय निर्णय घेणार याकडे आपले लक्ष आहे. पिक आणि हार्वेस्टर याबाबत बीड येथील डीपीडीसी मध्ये चर्चा झाली पाहिजे. सर्व प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केले. जोपर्यंत बीड आणि परभणीमधील सोमनाथ व संतोष यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाला न्याय द्यावा असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
