संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबांना न्याय द्या.

0
images (65)

संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबांना न्याय द्या.

मुंबई, दि. २९ जानेवारी:

तंत्रज्ञानाच्या युगात 50 दिवस झाले, तरी एक खुनी मिळत नाही? तो फरार असेल, तर कुठे गेला? एआयमध्ये गेला का? देशमुख कुटुंबीय आणि राज्याची चेष्टा लावलीये का? 50 दिवसांनंतरही फरार माणूस मिळत नसेल, तर यंत्रणा काय करत आहे? हा गंभीर प्रश्न आहे. 50 दिवसांपूर्वी राज्यातील एका मुलाची हत्या झाली. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या कुटुंबासाठी न्याय मागत आहे. या सरकारने नैतिकता ठेवून संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, माझ्यामुळे पक्षाची दररोज हेडलाईन होत असेल, तर नैतिकतेनं मी पहिल्याच दिवशी पक्षाकडं माझा राजीनामा दिला असता, मी इथं पक्ष वाढवायला आली आहे. पक्षाला अडचणीत आणायला नाही. माझ्यामुळे पक्षाची रोज हेडलाईन होत असेल तर मी एक पाऊल मागे घेतलं असतं. माझी इन्क्वायरी करा, दूध का दूध और पानी का पानी, होऊ द्या, असं मी केलं असतं असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले.

बीड प्रकरणावर चॅनलवर रोज एक नवीन पुरावा येत आहे, अजून काय पुरावे पाहिजेत? अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक आणि छगन भुजबळ या सर्वांना ऐकीव बातम्यांवर अटक झाली होती, असा दावा त्यांनी केला. या ऐकीव बातम्यांवर ते सर्व जेलमध्ये गेले होते. त्यांना वर्षे-वर्षे तुरुंगात राहावं लागलं होतं. संतोष देशमुख प्रकरणात तर अनेक पुरावे आहेत. सत्तेतले लोकही आरोप करतायत. आम्ही विरोधात आहोत, आम्हाला बाजूला ठेवा. पण, सत्तेतील तिनही पक्षाचे आमदार यावर बोलत आहेत असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *