कराड

अखेर वाल्मिक कराडला मकोका

बीड, दि. १५ जानेवारी.

वाल्मिक कराडवर अखेर मकोका लावण्यात आला आहे. याआधी कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.एसआयटीने हा गुन्हा दाखल करून वाल्मिक कराडचा ताबा मागितला व त्यानुसार कोर्टाने एसआयटीला वाल्मिक कराडचा ताबा दिला. संतोष देशमुख हत्येप्रकरमी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात येत होते. या खून प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती पण वाल्मिक कराड मात्र फरार होता. फरार असलेला वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला पुण्यात सीआयडीला शरण आला, त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होता,

वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तर संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी हे कराडशी संबंधित आहे त्यामुळे संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का? याचा तपास करायचा आहे. आरोपी आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे. वाल्मिक कराडला राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई होत नव्हती, कराड शरण आला तरी त्याच्यावर मकोका लावण्यात आला नव्हता. पण आता मकोका लावल्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे.

वाल्मिक कराडला मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक झाले, त्यांनी परळी बंदची हाक दिली. वाल्मिक कराड यांच्या आईने सुद्धा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. परळीतील सर्व व्यवहार ठप्प करण्यात आले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *