IMG-20241108-WA0113

विकासाचा विजय! सुशासनाचा विजय!

नवी दिल्ली, दि. २३ नोव्हेंबर ;

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा व युतीच्या दणदणित विजयाचा जल्लोष सुरु असून सर्व स्तरातून युतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भाजपा युतीचे व सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना एक्सवर मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदी शुभेच्छा देताना म्हणाले की, एकजुट होऊन आपण आणखी मोठी भरारी घेऊ. रालोआला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींचे , विशेषतः राज्यातील युवक आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. हे प्रेम आणि जिव्हाळा अतुलनीय आहे. जनतेला मी ग्वाही देतो की महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी यापुढेही काम करत राहील.

जय महाराष्ट्र!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *