भाजपच्या शायना NC शिंदेसेनेकडून मुंबादेवीच्या उमेदवार.

0
IMG-20241029-WA0111

मुंबई, ता. २९ ऑक्टोबर ;

मुंबादेवी विधानसभा मतदार संघात महायुतीकडून शायन एनसी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शायना एनसी यांनी नुकताच शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता. शिवसेनेकडून मुंबादेवी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. शायना एनसी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

शायना म्हणाल्या की जनता जर्नादनाचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता एक स्पष्ट आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महाराष्ट्रात बहुमताने महायुतीचे सरकार बनेल. मुंबादेवी मतदार संघाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण दिवस रात्रं काम करु, असे शायना एनसी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *