माजी आमदार कल्याणराव पाटील NCP मध्ये.

0
IMG-20241023-WA0060

येवला, दि.२४ ऑक्टोबर:-

येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला.

मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या २० वर्षाच्या कालावधीत येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली. त्यांच्या नेतृत्वाखाली येवला लासलगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे मंत्री छगन भुजबळ यांचे बळ अधिक वाढणार आहे.

माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या प्रवेशानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *