20200918_202354

नवी दिल्ली, दि 18  सप्टेंबर:

नरेंद्र मोदी सरकारच्या कृषि क्षेत्रातील तीन विधेयकावरून देशातील वातावरण तापले असून सरकारवर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेस खा. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींच्या शेतकरी विरोधी धोरणांना कडाडून विरोध करत जनतेचा मोदींंवर विश्वास राहिलेला नाही, असे म्हणाले आहे.

मोदीजींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे वचन दिले होते, दिडपटीने हमी भाव देणार होते पण ते कधीच झाले नाही. आता मोदी सरकारचे काळे कायदे शेतकरी आणि शेतमजूरांचे आर्थिक शोषण करण्यासाठी आणले आहेत. हे जमीनदारीचे नवे स्वरूप आहे आणि मोदीजींचे काही मित्र नव्या भारताचे जमीनदार असतील. कृषी बाजार बंद झाला की, देशाची अन्न सुरक्षा संपली, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

कृषीक्षेत्र खुले करणारी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य, किंमत हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) अशी तीन विधेयके केंद्र सरकारने संसदेत मांडली होती. आंतरराज्यीय शेतीमाल विक्रीला मुभा देणारी, कृषी बाजार समित्यांची एकाधिकारशाही रद्द करणारी व कंत्राटी शेतीला परवानगी देणारी दोन विधेयके लोकसभेत गुरुवारी मंजूर करण्यात आली तर जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले आहे.

या कृषी विधेयकांवरून एनडीएतील भाजपाचा जुना मित्र पक्ष शिरोमणी अकाली दलाने मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर जेडीयू, पासवानही नाराज असल्याचे समजते. पंजाब, हरयाणासह अनेक राज्यात शेतकऱ्यांनी या विधेयकाला  आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *