लॉकडाऊनमध्येही भाजीविक्रीतून लाखोंची कमाल

0
Vegetable Market

लॉकडाऊनमध्येही भाजीविक्रीतून लाखोंची कमाल.

कोल्हापूर, दि. ७ जून २०२०

लॉकडाऊनमध्ये बहुतांशी उद्योग-व्यवसायांचे शटरडाऊन असताना, रेणुका स्वयं-सहाय्यता समुहाच्या दारावर मात्र भाजी पाल्याने ‘नॉक’ केले. गडहिंग्लज तालुक्यातील हिटणीमधील या समुहाने लॉकडाऊनच्या काळामध्ये भाजीपाला आणि फळे विक्री करून १ लाख २० हजाराची उलाढाल केली.

गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असल्याने येथे मराठीबरोबरच कन्नड भाषासुध्दा बोलली जाते. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि स्वर्ण जयंती ग्रामस्वरोजगार योजना अंतर्गत हा समूह कार्यरत आहे.

कोव्हिड-19 मुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये या समुहाने भाजीपाला व फळे विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात जोपासला. कोबी, वांगी, फ्लॉवर, शेवगा, सिमला मिरची, टोमॅटो, लिंबू, आले, कोथिंबीर, दोडका, कारली, मेथी, हिरवी मिरची, लसूण, कडीपत्ता या भाजीपाल्याबरोबरच केळी, पपई, आंबे व कलिंगड या फळांची विक्री त्यांनी केली. गटातील काही सदस्य स्वत: उत्पादक आहेत तर इतर सदस्य भाजीपाला घाऊक खरेदी करून विक्री करीत आहेत.

या भाजी-पाला विक्रीमध्ये एकूण १ लाख २० हजार इतकी उलाढाल झाली असून गटास १८ हजार रूपयांचा नफा झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात ‘डाऊन’ होऊन हताशपणे न बसता या समुहाने आलेल्या संधीचे नफ्यात रूपांतर करुन एका नवा आदर्श घालून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *