मविआ सरकार आल्यास ‘लाडकी बहिण’ बंद !

0
IMG-20240104-WA0105

मुंबई, दि. १३ ऑक्टोबर;

“आमचं सरकार आलं की महायुती सरकारचे निर्णय रद्द करू” अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावरून केली आहे. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनो सावध व्हा. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहिण योजना बंद पाडली जाईल.

याआधी काँग्रेसनं लाडकी बहिण योजनेला विरोध केला. आता उद्धव ठाकरेही तीच भाषा बोलत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहिण योजना, अर्ध्या तिकीटात प्रवास, मोफत वीजबिल, एक रुपयात पीक विमा, शेतकऱ्यांना मिळणारा किसान सन्मान निधी बंद केला जाईल. त्यामुळे सावध व्हा !

उद्धव ठाकरे, तुम्ही केवळ भाजपा आणि महायुती सरकारच्या द्वेषापोटी आमच्या भगिणींच्या पोटावर पाय देऊ पाहत आहेत. सामान्य जनतेला उपाशी ठेऊ पाहत आहेत, ही जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *