IMG-20240331-WA0104

मुंबई  दि. ३० सप्टेंबर;

रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत विधानसभा निवडणुकीत 10 ते 12 जागा देण्याची मागणी केली आहे.

मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र अशा संबंध महाराष्ट्रातील निवडक जागांची यादी देवुन रिपब्लिकन पक्षाला 10 ते 12 जागा सोडण्याची भाजपकडे मागणी केली आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाला 1 विधानपरिषद  आणि 2 महामंडळाची चेअरमनपदे, राज्यातील महामंडळाची सदस्य पदे देण्यात यावीत अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भाजपला करण्यात आली आहे. अशी माहिती रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा यंदा 67 वा वर्धापन दिन 3 ऑक्टोबरला ऐतिहासीक सातारा नगरीत  होणार आहे. या वर्धापन दिन सोहळयाचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साता-याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र राजे भोसले उपस्थित राहणार आहेत.  यावेळी अध्यक्षस्थानी रिपाइंचे राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे आणि स्वागताध्यक्ष पदी रिपाइंचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक  गायकवाड  राहणार आहेत.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साता-यातील प्रतापसिंह विद्यालयात इयता पहिलीत प्रवेश घेवून शिक्षण घेतले होते. त्या ऐतिहासीक आठवणींना सातारा शहराने जपुन ठेवले आहे. त्यामुळे ऐतिहासीक सातारा नगरीत रिपब्लिकन पक्षाचा 67 वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिन सोहळयास राज्यभरातील हजारो रिपब्लिकन कार्यकर्ते आणि आंबेडकरी अनुयायी उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन वर्धापन दिन सोहळयास सर्व  जातीधर्मीय जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *