अहो शिंदे फडणवीस, कर्नाटकातील घटना फेक आहे!

0
images - 2024-09-15T125358.828

मुंबई, दि. १५ सप्टेंबर;
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकातील एका घटनेबद्दल खोटी माहिती पसरवून सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा घणाघाती प्रहार करत भाजप आणि महायुती फेक नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले पुढे म्हणाले की, अगोदर खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल स्वतःच फेक न्यूज पसरवून आंदोलन केले आणि
आता कर्नाटकातील एका घटनेबद्दल खोटी माहिती देऊन फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण राज्यातील सुज्ञ जनता यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. जनतेला यांचा खरा चेहरा माहित आहे असे प्रत्युत्तर पटोले यांनी दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणारे विरोधक कर्नाटकमध्ये गणरायाचे उत्सव बंद करणाऱ्या काँग्रेस सरकार बाबत मूग गिळून गप्प बसले आहेत. कर्नाटकात गणपती बाप्पांच्या मूर्तींनाच अटक केल्याचे पाप कुठे फेडणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले होते पण ही घटना खोटी निघाली. भाजपाच्या आय टी सेलने खोटी माहिती पसरवल्याचे उघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *