राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार यावे.

0
IMG-20240907-WA0114

पुणे, दि. ७ सप्टेंबर;

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोहे यांच्या पुण्यातील सिल्वर रॉक्स या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना करण्यात आली. उपसभापती डॉ. नीलमताई गो-हे यांनी मनोभावे गणरायाची आरती करून राज्याच्या सुखसमृद्धी व भरभराटीची कामना केली.

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार यावे. भविष्यात होणारी विधानसभा निवडणूक शांततामय मार्गाने आणि लोकशाही मजबूत करणारी असो अशी प्रार्थना डॉ. नीलमताई गो-हे यांनी गणरायाकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *