लाॅकडाऊनमध्ये 1.50 लाख मद्य परवाने!
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहीती.
मुंबई दि. १७ सप्टेंबर :
राज्यात १५ मे २०२० पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. काल दिवसभरात ४ हजार १५३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ३ हजार ८५८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
मद्य विक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण १०,७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ९,५७९
अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने ३ मे, २०२० पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात १५ मे २०२० पासून घरपोच मद्यविक्री योजनाअंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याचीसुविधा उपलब्ध आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ जून २०२० या काळात १ लाख ५४ हजार २६९ ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी १ लाख ४९ हजार ४२९ ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.
ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेतांना येतअसलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असूनआता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणालाऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्याकार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीने सुध्दाउपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुनमिळू शकतात.
राज्यात 24 मार्च, 2020 पासुन लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. १६ सप्टेंबर २०२० रोजी राज्यात ८९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ५० आरोपींना अटक करण्यात आली असून २५ लाख ३० हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२४ मार्च, २०२० पासुन १५ सप्टेंबर २०२० पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण १८,०७४ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९,७६४ आरोपींना अटककरण्यात आली आहे. १,६८० वाहने जप्त करण्यात आली असून ४१ कोटी ७७ लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सअँप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून [email protected] ई-मेल आहे.
