नवी मुंबई एअरपोर्टला दि .बा.पाटील यांचे नाव द्या

0
images - 2024-08-09T120909.490

दिल्ली, दि. ९ ऑगस्ट :

मुंबई एअरपोर्ट वरील विमांनांचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन एअरपोर्टला दि .बा.पाटील असे नाव देण्याची जी जनतेची मागणी आहे ती पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत केली.

नवी मुंबई येथे नवीन एअरपोर्ट तयार करण्यात येत आहे. हे एअर पोर्ट कधी पर्यंत तयार होणार याबाबतची स्पस्टता नाही. या एअरपोर्टचे काम कधी पूर्ण होणार? जनतेच्या मागणी नुसार या एअरपोर्टला दि .बा.पाटील नाव देण्याचा जो प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे, तो मंजूर करून एअरपोर्टला दि .बा. पाटील नाव देण्यात यावे, अशी मागणी कारतांनाच रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथी चिपी विमानतळाच्या विकासासाठी प्राधान्य द्यावे, अशी विनंती केली.

मुंबईतील सांताक्रूझ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या फक्त दोनच रनवे आहे जे ऐकमेकांना क्रॉस करतात, त्यामुळे विमान उड्डाण घेताना तसेच उतरताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. या विमानतळालगतच झोपडपट्टी आहे. देशातील पायाभूत सुविधेसाठी केंद्रसरकारने ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद किली आहे. विविध शहरातील पायाभूत सुविधा तसेच गरीब, मध्यमवर्गीय यांच्या विकासाठी ठेवण्यात आलेल्या या निधी पैकी १ लाख कोटी निधी देण्यात यावे. हा निधी प्राप्त झाल्यास येथील झोपडपट्टीचा शासनामार्फत पुनर्विकास करून या ठिकाणी अतिरिक्त रनवे तयार करणे शक्य होईल. त्यामुळे हा निधी देण्यात यावा, अशी मागणी करत, याबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पस्ट करावी, अशी विनंती वायकर यांनी संबंधीत खात्याचे मंत्री यांना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *