बिल्डरवर सरकार मेरबान,चड्डाच्या घशात 400 कोटी!

0
images - 2023-08-22T124144.288

मुंबई, दि. २३ जुलै :-

गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का? असा संतप्त सवाल करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

पत्रकार परिषदेत वडेट्टीवार म्हणाले की, सरकारची तिजोरी खासगी बिल्डरसाठी महायुती सरकारने खुली ठेवली आहे. हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर जाता-जाता घातलेला दरोडा आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हा निर्णय मान्य आहे का हा देखील प्रश्न आहे. चढ्ढा डेव्हलपर्स आणि प्रमोटर या दिल्लीस्थित कंपनीवर ही मेहेर नजर दाखविण्यात आली आहे. २०२१ मध्ये या विकासकाशी म्हाडाने करार केला. मात्र आतापर्यंत एकाही घराचा ताबा लाभार्थीना दिलेला नाही असे असताना त्याला 400 कोटींची खिरापत का दिली. गृहनिर्माण विभागाने असा निधी देण्यास विरोध दर्शविल्यानंतरही हा निधी देण्यासाठी कोण दबाव आणला याची चौकशी झाली पाहिजे.

सीबीआयने कारवाई केल्यावर तुरूंगात गेलेला डिंपल चड्डा हा बांधकाम व्यावसायिक राज्य सरकारचे पैसे घेऊन परदेशात पळून गेला तर? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *