मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे व शरद पवार.
मुंबई, दि २२ जुलै :
देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या परिश्रमाने मराठा आरक्षणाच्या कायद्याचा मसुदा तयार केला, मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आहेत, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
राज्याचे प्रभारी व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, सह प्रभारी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, प्रदेश पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे सरकारने मोदी सरकारच्या 18 योजना बंद पाडल्या. ओबीसी समाजाचे परत गेलेले आरक्षण एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी आणले. महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवण्याचे पाप केले, असा घणाघातही त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकार राज्यात आले तर मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडतील. राज्यात महायुतीचे सरकार आले तर विकासाचे डबल इंजिन धावणार आहे, हे आपण जनतेला सांगावे.
जिद्दीने संघर्ष करण्याचा आपला पिंड आहे, त्यामुळे आपण बूथ यंत्रणा मजबूत करून प्रत्येकाने नवे दहा मतदार मिळवण्यासाठी काम करायचे आहे.तसे झाले तर विधानसभा निवडणुकीत महायुती दोनशे पार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पक्षाकडून काय मिळेल याचा विचार न करता आगामी 2-3 महिन्यात नेतृत्वावर श्रद्धा ठेवून काम करा, प्रत्येक बूथवर नवीन मतदार नोंदवा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी पुणे येथे केले. प्रदेश भाजपाच्या अधिवेशनात बावनकुळे बोलत होते.
सलग तिसऱ्या वेळेस पंतप्रधान झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मांडला. विविध लोककल्याणकारी योजना सादर केल्याबद्दल राज्यातील महायुती सरकारचे अभिनंदन करणारा ठराव मुंबई भाजपा अध्यक्ष आ.आशीष शेलार मांडला.
