मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे शिवसेनेकडून स्वागत..

0
IMG-20240628-WA0065

मुंबई, ता २८ जून :

महायुती सरकारने विधी मंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही महिला विकास योजना जाहीर केली. या योजनेचे शिवसेना महिला सेनेने जोरदार स्वागत केले. या योजनेबाबत शिवसेना पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथे महिला सेनेने सेलिब्रेशन करून आनंद साजरा केला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेच्या घोषणेमुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने महिला सक्षमीकरणासाठी अनेक निर्णय घेतले होते. एस. टी प्रवासात महिलांना सरसकट ५०% सवलत लागू करण्यात आली होती. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर झाली आहे. या योजनेसाठी ४६००० कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय पदवीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण, महिला ई रिक्षासाठी अर्थसहाय्य, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत, यासारखे मोठे निर्णय सरकारने घेतले आहेत. याचा थेट फायदा राज्यातील लाखो महिलांना होणार आहे.

 

सरकारच्या या निर्णयाचे शिवसेना महिला सेनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. सरकार महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आजचा निर्णय समस्त महिला वर्गासाठी महत्वाचा असल्याची भावना शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केली.

या निर्णयाचा जल्लोष करण्यासाठी बाळासाहेब भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतें. या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या मीना कांबळी, शिवसेना सचिव आमदार डॉ. मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या ऍडव्होकेट सुशिबेन शहा आणि सर्व महिला विभाग प्रमुख, महिला नेत्या, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *