बौद्ध धम्म हेच लोकशाही विचारांचे उगमस्थान..

0
images - 2024-05-24T112137.822

मुंबई दि. २४ मे:

महाकारुणी तथागत भगवान गौतम बुध्दांनी अडीच हजार वर्षापूर्वी भारतात सर्वप्रथम बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जगाला लोकशाहीचा मुलमंत्र दिला. संपूर्ण जगाला लोकशाहीचा विचार बौध्द धम्मानेच दिला आहे, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

गौतम बुद्ध यांनी जगाला विश्वशांती, अहिंसा, समता, विश्वबंधुतत्व आणि वैज्ञानिक दृष्टीकोन दिले आहे.जगात अनेक ठिकाणी युध्दजन्य स्थिती आहे. युध्दाच्या रक्तपातापासुन जगाला वाचवण्यासाठी आजही भगवान बुध्दाच्या विचारांची गरज आहे.बौध्दधम्म सर्व मानवजातीसाठी आदर्श जीवन मार्ग आहे. माणसांच्या मनात विचारांचे द्वंद्व सुरु असते.सर्व क्रिया आणि क्रांतीचे मन हेच केंद्र आहे.मनावर विजय मिळविला तर माणुस जगावर विजय मिळवू शकतो. मनावर विजय मिळविण्यासाठी विपश्यनेचा मार्ग भगवान बुध्दांनी जगाला दिला आहे.भगवान बुध्दांचा विचार हा संपूर्ण मानव जातीचा उध्दार करणारा विचार आहे.बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौध्दधम्माची दिक्षा दिल्याचा आम्हाला अभिमान आहे असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *