आठवले उत्तर भारतात NDA चा प्रचार करणार.  

0
IMG-20240331-WA0104

मुंबई दि. २१ मे :-

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर भारत दौऱ्यावर रवाना झाल आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) चे रामदास आठवले हे राष्ट्रीय स्तरावर स्टार प्रचारक आहेत. मुंबईतुन आज त्यांनी दिल्ली ला प्रयाण केले. दिल्ली येथून दुपारी हरियाणाच्या सोनीपथ,कर्नाल आणि अंबाला या लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवारांचा प्रचार रामदास आठवले करणार आहेत.

कर्नाल येथे भाजपचे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर लोकसभा निवडणुक लढत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी रामदास आठवले कर्नाल येथे उपस्थित राहणार आहेत.

 

22 मे रोजी रामदास आठवले उत्तर प्रदेश मधील विविध लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. 22 रोजी जौनपुर येथे भाजप उमेदवार कृपाशंकर सिंग यांच्या प्रचारासाठी रामदास आठवले जौनपुर येथे रोड शो आणि जाहिर सभांना संबोधित करणार आहेत.22 आणि 23 मे रोजी रामदास आठवले जौनपुर, वाराणसी, सारनाथ या ठिकाणी ते भेटी देणार आहेत. वाराणसी लोकसभा मतदार संघात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निवडणुक लढत आहेत.

25 मे रोजी रामदास आठवले पंजाब राज्यात भाजप एनडीए उमेदवारांचा प्रचार कारणार आहेत. 27 मे रोजी रामदास आठवले हे सुप्रसिध्द अभिनेत्री कंगणा राणावत या भाजप तर्फे निवडणुक लढत असलेल्या हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघात प्रचार सभांना संबोधित करणार आहेत.  23 मे रोजी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुध्द यांची 2586वी जयंती बुध्द पौर्णिमा सारनाथ येथील प्राचीन सांची स्तुप येथे साजरी करण्यात येणार आहे.बुध्द जयंतीचा मंगल उत्सव सारनाथ येथे रामदास आठवले साजरा करणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *