EVM विरोधात 17 तक्रारी, ईशान्य मुंबईत सावळा गोंधळ..
मुंबई, दि. २१ मे –
राज्यात 13 जांगासाठी पाचव्या आणि अंतिम टप्प्याच्या मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरवात झाली. ईशान्य मुंबई मतदार संघात ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड, तसेच धीम्या गतीने चालत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत तर दोन ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे या सर्व तक्रारी शिवाजी नगर, मानखुर्द व भांडुप भागातल्या असून या ठिकाणाहुन ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना सर्वाधीक मतदान होणार आहे.
मानखुर्द शिवाजी नगर येथील बुथ क्रमांक 13 ते 19 मध्ये सर्व ईव्हीएम मशीन अत्यंत धीम्या गतीने चालत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. तर भांडुप पश्चिम येथे बुथ क्रमांक 157 ते 166 या ठिकाणीही ईव्हीएम धीम्या तीने चालू आहे. याच प्रमाणे 13 ते 19 तसेच 63, 65, 111, 208, 209, 210 मानखुर्द या ठिकाणी ईव्हीएम मशीन धीम्या गतीने चालू आहेत. तर मानखुर्द शिवाजी नगर या ठिकाणी बुथ क्रमांक 293, 294, 295 येथील ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला. त्यामुळे या ठिकाणी मतदान काही काळ थांबले होते. तसेच मानखुर्द शिवाजी नगर येथील बुथ क्रमांक 66 या ईव्हीएम मशीस मध्ये ही बिघाड झाला होता. तर भांडुप पश्चिम येथे बुथ क्रमांक 86 मध्ये ईव्हीएम मशीन बंद पडली होती. तर घाटकोपर पश्चिम येथील 58 आणि 98 या ठिकाणी मशिन मध्ये बिघाड झाला होता. तर मानखुर्द शिवाजी नगर बुथ क्रमांक 23 या ठिकाणी मशीन धीम्या गतीने चालण्याच्या तक्रारी आल्या होत्या.तसचे मानखुर्द शिवाजी नगर 100,103,157. 166,168,169 या मशीन धीम्या गतीने सुरु आहेत. तर मयुरेश पार्क, भांडुप पश्चिम या ठिकाणी मशीन धीम्या गतीने सुरु आहेत. तर मुलुंड पश्चिम या ठिकाणी बुथ क्रमांक 8 मध्ये धीम्या गतीने मशीन सुरु आहेत. तर भांडुप पश्चिम येथे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. तर घाटकोपर येथे बुथ क्रमांक 96 आणि 169 मध्ये ही मशीन धीम्या गतीने चालल्या आहेत, भांडुप पश्चिम या ठिकामी बुथ क्रमांक 40 येथे मशीन धीम्या गतीने सुरु असल्याच्या तक्रारी आल्या असून याबाबत संजय दिना पाटील यांनी निवडणुक आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.
ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना मानखुर्द, शिवाजी नगर, भांडुप या विभागातून सर्वाधिक मतदान होणार आहे. अशा स्थितीत याच भागातील ईव्हीएम मशीन बंद पडणे, धीम्या गतीने चालणे तसेच अचानक विद्युत पुरवठा खंडीत होणे. जेणे करुन या भागातील मतांवर त्याचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदान कमी झाले तर संजय दिना पाटील यांच्या मतांमध्ये कमी होण्याची शक्यता अधिक आहे. सत्ताधा-याकडून असले कृत्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
