मराठी Not Welcome म्हणना-यांना मतदान करु नका.

0
images - 2024-05-08T172304.443

मुंबई, दि. ८ मे :
मराठी नॉट वेलकम म्हणत मराठी लोकांना घरे नाकारणा-यांचे समर्थन करणा-या उमेदवारांना कृपया मत देऊ नका, असे परखड विचार सुप्रसिध्द अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सोशल मिडीयावर मांडले.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आपले विचार मांडतांना त्यात लिहले आहे की, “ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखले जाते अशा लोकांचे समर्थन करणा-या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका. कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुध्द मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाही, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे”.

ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ गेलेल्या शिवसैनिकांना घाटकोपर येथील ‘समर्पण’ या इमारती मध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. मराठी लोकांनी या ठिकाणी प्रवेश करु नये ही गुजराती लोकांची सोसायटी आहे असे सांगितले. शेवटी हा वाद इतका वाढला की पोलिसांना येऊन मध्यस्थी करावी लागली.

दुसरीकडे नोकरीची जाहिरात काढतांना मराठी लोकांनी नोकरीसाठी येऊ नये असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला व कंपनीला माफी मागुन ही जाहिरात मागे घ्यावी लागली. गुजराती समाजाकडून जाणीवपुर्वक मराठी गुजराती वाद निर्माण केला जात असून मुळ मुंबईकर असलेल्या मराठी लोकांनाच गुजराती लोकांकडून मुंबईत घर, दुकान न देण्याच्या अनेक घटना या आधी देखील घडल्या आहेत. अशीच परिस्थिती राहीली तर मुंबईमध्ये मराठी माणसांना राहणे अवघड होऊन जाईल अशी प्रतिक्रीया घाटकोपर मधील काही रहिवाश्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *