पियुष गोयल यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद..
मुंबई, दि. ६ मे :
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मुंबईत 20 तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर मुंबईचे भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार पियुष गोयल यांची प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी नागरिकांनी पियुष गोयल यांच्या समर्थनार्थ ‘जय श्रीराम’चा जयघोषही केला.
सकाळी एस. एन. दुबे रोड जवळील हनुमान मंदिरात बजरंगबलीचे दर्शन घेऊन पियुष गोयल यांनी प्रचार रॅलीला सुरुवात केली. ठिकठिकाणी प्रचार रॅलीच्या निमित्ताने पियुष गोयल यांचे फटाक्यांची आतिषबाजी करत, फुलांची उधळण, पुष्पहार घालून नागरिकांकडून जंगी स्वागत करण्यात आले. पियुष गोयल यांनीही हात उंचावून अभिवादन करत ज्येष्ठासह नागरिकांचे आशीर्वाद स्वीकारले. ज्ञानेश्वर नगर, कोंकणीपाडा, सूर्योदय सोसायटी, कामत हॉटेल, विद्याभूषण शाळा, मारुती मंदिर, श्रीनाथ नगर, वीरसावरकर नगर, महिंद्रा नेन्सी कॉटेज, या ठिकाणाहून ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या या प्रचार रॅलीची शांतीवन बोरिवली (पूर्व) येथे सांगता झाली.
याप्रसंगी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर यांसह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
