मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली सलमानची भेट…

0
IMG-20240416-WA0173

मुंबई, दि. १६ एप्रिल :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे स्थित गेलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. यावेळी सलमान खान याचे वडील ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान हेदेखील उपस्थित होते.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सलमान आणि त्याच्या कुटूंबियांना त्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेची हमी दिली. तसेच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचेही सांगितले. सलमान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा घटनेनंतर दोनच दिवसात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यातील दोन आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खान कुटूंबियांची भेट घेऊन त्यांना झालेल्या कारवाईची माहिती दिली तसेच त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण हमी दिली.

यावेळी माजी आमदार बाबा सिद्दीकी, आमदार झिशान सिद्दीकी आणि युवासेनेचे राहुल कनाल हेदेखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *