मविआचे जागा वाटप जाहीर, कोणाला किती जागा ?

0
FB_IMG_1712666277636

मुंबई, दि. ९ एप्रिल;

महाविकास आघाडीचे जागा झाले असून संयुक्त पत्रकार परिषदेत त्याची घोषणा करण्यात आला. काँग्रेस १७, शिवसेना २१ तर राष्ट्रवादी काँग्रेस १० जागा लढवणार आहे. सांगलीची जागा शिवसेना तर भिवंडीची जागा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे.

मविआचे जागा वाटप खालील प्रमाणे आहे.
काँग्रेस – (१७) नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, रामटेक, जालना, नांदेड, लातूर, मुंबई उत्तर मध्य, उत्तर मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) (१०)- बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, माढा, रावेर, अहमदनगर दक्षिण, बीड, दिंडोरी, वर्धा,
शिवसेना- (२१) जळगाव, परभणी, नाशिक, ठाणे, पालघर, कल्याण, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, यवतमाळ, वाशिम, दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, ईशान्य मुंबई.

शिवालय येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, समाजवादी गणराज्य पक्षाचे कपील पाटील, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, माकपा पक्षाचे नेते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *