देशात लोकांचे न्याय करणारे राज्य असू दे!

0
IMG-20240409-WA0094

पुणे दि. ९ एप्रिल :

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुढी पाडवा तसेच मराठी नूतन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आज सकाळी त्यांच्या पुणे येथील सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी विधिवत गुढी उभारण्यात आली. यावेळी त्यांच्या भगिनी आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा दिवस हा, ब्रम्हध्वज म्हणजे गुढी उभारून त्याची विधिवत पूजा करून वंदन करण्यात आलेले आहे. अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम आल्यावर जसं रामराज्य सुरू झालं, तशा प्रकारचं या देशावरती लोकांचं न्याय करणारं राज्य असू दे, देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार अशा प्रकारच महायुतीच सरकार यावं अशा प्रकारची प्रार्थना गुढीकडे केलेली आहे.

महाराष्ट्रातील, देशातील सर्व जनतेला सौख्य, आरोग्य, यश प्राप्त व्हावं. लोकांमधील परस्पर स्नेह, बंधुभाव व एकोपा वृद्धिंगत होवो या प्रार्थनेसह सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *