भ्रष्टाचारमुक्त भारत हा नरेंद्र मोदींचा नारा.

0
IMG-20240331-WA0104

डेहराडून, दि. ५ एप्रिल :

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील १० वर्षात देश विकासाच्या देशेने पुढे जात आहे.भारत भ्रष्टाचार मुक्त करण्याचे काम मोदींनी केले आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत मोदींचा आहे नारा त्यामुळे देशात आमचा भाजपला पाठिंबा आहे. असे सांगत उत्तराखंडच्या लोकसभेच्या सर्व ५ जागांवर भाजपला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केला.

डेहराडूनच्या विकास सिने हॉल येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत रामदास आठवले यांनी भाजप च्या उत्तराखंड मधील लोकसभेच्या सर्व ५ जागांवर रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उत्तराखंड चे प्रमुख सेठपाल सिंग उपस्थित होते. यावेळी उत्तराखंड च्या १२ जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. उत्तराखंड च्या १२ जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे संघटन मजबूत आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एन डी ए सरकार देशात सर्व जाती धर्मियांना सामाजिक आर्थिक न्याय देत आहेत. रिपब्लिकन पक्ष मागील १२ वर्षांपासून भाजप सोबत आहे. प्रधानमंत्री मोदींनी सत्तासूत्र हाती घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून भ्रष्टाचार मुक्त भारत चा नारा दिला आहे त्यामुळे गरीब जनते पर्यंत सरकारचा निधी पोहोचत आहे असे रामदास आठवले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *