उत्तर मुंबई ‘स्लम मुक्त’ करू ही माझी गॅरंटी..

0
20240323_192455

मुंबई, दि. २३ मार्च ;

भारताला स्लम पासून मुक्त करायचे आहे. याची सुरुवात उत्तर-मुंबईपासून करणार आहोत. उत्तर- मुंबईत एकही घर स्लमचे असणार नाही ही आमची सर्वांची गॅरंटी आहे, ही माझी गॅरंटी आहे, असे आश्वासन उत्तर-मुंबईतील भाजपा-महायुतीचे लोकप्रिय उमेदवार पियुष गोयल यांनी दिले आहे.

यावेळी महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या भाषणाच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांनी ‘अब की बार ४०० पार, फिर एक बार मोदी सरकार’, ‘जय श्री राम’, असा जयघोष केला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना गोयल म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या आधार, मेहनतीवर, आशीर्वादामुळे अनेक वर्षाच्या तपस्येनंतर भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. ७० वर्षात पक्षाने अनेक चढउतार पाहिले, अनेक समस्या झेलल्या, संकटांना सामोरे गेले मात्र भाजपा हा असा पक्ष आहे ज्याचे कार्यकर्ते संघर्ष करत राहिले आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत स्थितीत असल्याचे देशच नाही तर संपूर्ण जग बघत आहे. त्यांच्या नेतृत्वाने भारतीय नागरिकांच्या जीवनात उत्साह, आत्मविश्वास निर्माण झालाय. येणाऱ्या काळात प्रत्येक गरीबाच्या जीवनात बदल होणार. प्रत्येक जातीधर्माच्या व्यक्तीला पंतप्रधान मोदींच्या सरकारमध्ये योजनांचा लाभ मिळालाय. आजही देशातील ८० कोटी मध्यमवर्गीयांना मोफत रेशन धान्य मिळत आहे. देशातील १४० कोटी जनतेला चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात हे पंतप्रधान मोदींचे उद्दिष्ट आहे.

स्वामी विवेकानंद यांनी जगाला भारताच्या संस्कृतीला, इतिहासाला किती मजबूत वारसा आहे हे दाखवून दिलेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबाच्या कल्याणाचा, या देशातून गरिबी हटविण्याचा, भारताला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यांनी २०४७ पर्यंत भारताने विश्वशक्ती बनून जगाची अर्थव्यवस्था चालवण्याचा संकल्प केलाय. मोदींनी गॅरंटी दिलीय तिसऱ्या टर्मला भारत पाच ट्रिलियन डॉलर पार जाणार आणि जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणार. तसेच भारताला स्लम पासून मुक्त करायचे आहे. याची सुरुवात उत्तर मुंबईपासून करणार, उत्तर मुंबईत एकही घर स्लमचे असणार नाही ही आमची सर्वांची गॅरंटी आहे, ही माझी गॅरंटी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आम्ही सर्व मिळून योजनावर काम करतोय की मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य शहरांना स्लम मुक्त कसे करू शकतो.

इंडिया आघाडीतील नेत्यांनी मोदींवर बरीच टीका केली. १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून शौचालयाची घोषणा कोण करते म्हटले. पण मोदी शौचालयाचे महत्व जानतात. त्यामुळेच देशात ११ कोटी मोफत शौचालय बनवले गेले. भारताला अजून पुढे जायचे आहे. भारताला योग्य ठिकाणी नेऊन जागतिक महासत्ता बनवणारा कोणी नेता असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. मोदींच्या परिवारातील येथे बसलेला प्रत्येक सदस्याला माहित आहे ‘मोदी है तो मुमकिन है’. त्यांना ताकद देण्याचे काम आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचेही आवाहनही गोयल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *