सुप्रियाताई, LPG दरावरून बोंबा कसल्या मारता?

0
images - 2024-03-08T230153.548

नागपूर, दि. ८ मार्च :
डोक्यात सतत राजकारण असल्याने सुप्रियाताईंना काळ वेळेचे भान राहत नाही. ‘जुमला’ शब्द मोठ्याने म्हणायचा आणि पिताश्री मंत्री असलेल्या काँग्रेस सरकारची गरीबांची, महिलांची पिळवणूक करणारी कृत्ये नजरेआड करायची. अहो, सुप्रियाताई कशाला सिलिंडरचे दर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कमी केल्याच्या बोंबा मारता? असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

नरेंद्र मोदी डोळ्यासमोर निवडणुका ठेवत नाहीत. तो धंदा तुम्हाला पोटापाण्याला लावणाऱ्या मनमोहन सिंग नेतृत्वातील यूपीए सरकारचा होता. मोदी सरकारचे धोरण मातृवंदन आहे. तुम्हाला आठवत नाही म्हणून सांगतो, गेल्यावर्षी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मोदींनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला. भारतातील ७५ लाख महिलांना मोफत गॅस सिलिंडर दिले होते…इतकेच नाही, तर सर्वसामान्य गॅस ग्राहकांच्या सिलेंडरवर २०० रुपयांची कपात केली होती…आणि उज्ज्वला गॅस योजनेतील (PMUY) माता भगिनींना सिलेंडरवर ४०० रुपयांची सवलत दिली होती.

जागतिक महिला दिनाचा मंगलयोग साधून नारीशक्तीला वंदन करण्यासाठी मोदींनी १०० रुपयांची कपात केली आहे. तुम्हाला हाही दिवस राजकीय वाटतो? जेव्हा UPA सरकारचे पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी 9 वरून १२सिलिंडर वाढवले होते तेव्हा निवडणुका नव्हत्या का? असा सवाल करत, ज्यांच्या शेतीच्या १० एकरातून ११३ कोटी रुपयांचे उत्पादन निघते त्यांना १०० रुपयांची भेट ‘निवडणूक जुमला’ वाटेल, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *