अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही.

0
IMG-20240228-WA0065

मुंबई, दि. ५ मार्च:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घराणेशाहीवर टीका केल्याच्या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, अमित शाह यांचा मुलगा जय शाह कोणते क्रिकेट खेळला की बीसीसीआयचा सचिव केला आहे. दुसऱ्याकडे एक बोट केले की चार बोटे आपल्याकडे असतात हे लक्षात ठेवावे. अमित शाह यांना घराणेशाहीवर बोलण्याचा काहीही अधिकार नाही.

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर भाजपाकडूनच अन्याय…

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव आहे परंतु भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव मात्र नाही. २०१९ साली पंतप्रधानपाने उमेदवार अशी गडकरी यांची चर्चा होती. भाजपाने पहिल्या यादीत गडकरींची उमेदवारी जाहीर न करून त्यांच्यावर अन्याय केला आहे, असे पटोले म्हणाले.

 

भाजपा नाही आता ‘मोदी परिवार’…

नरेंद्र मोदी यांना ज्या भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री केले, पंतप्रधान केले तो पक्ष आता मोदी परिवार झाला आहे. भाजपाच्या सर्व सोशल मीडिया हँडलवरून भाजपा नाहीतर ‘मोदी परिवार’च दिसत आहे. असा टोलाही पटोले यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *