बेस्ट बसच्या पासमध्ये केलेली दरवाढ त्वरीत रद्द करा.. 

0
images (25)

मुंबई, दि. १ मार्च:

मुंबईतील लाखो चाकरमानी प्रवासासाठी बेस्ट बसचा वापर करतात परंतु बेस्टने आता प्रवाशांच्या मासिक पासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. ७५० रुपयांच्या मासिक पाससाठी आता ९०० रुपये मोजावे लागणार आहेत तर दैनंदिन पासही ५० रुपयांऐवजी ६० रुपये करण्यात आलेला आहे. आज १ मार्चपासून ही दरवाढ लागू करण्यात आलेली आहे. आधीच महागाईने जनता त्रस्त असताना त्यात बेस्ट बसच्या पासची दरवाढ परवडणारी नाही म्हणून हा निर्णय त्वरीत रद्द करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे.

 

बेस्ट पास दरवाढीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करून आमदार वर्षाताई गायकवाड यांनी सामान्य मुंबईकरांच्या समस्या मांडल्या, त्यानंतर घनकचरा टेंडरचा प्रश्न उपस्थित करत वर्षाताई गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिकेने घनकचरा उचलण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. हे ग्लोबल टेंडर सर्वसामान्य कामगारांवर अन्याय करणारे आहे. घनकचरा उचलण्याचे काम महिला बचत गट, मराठी युवक, संस्था तसेच सामाजिक संस्था करत आहेत, या टेंडरमुळे या घटकांवर अन्याय होणार आहे. हे टेंडर पास झाल्यानंतर एमएमपी बंद होऊन ७५ हजार लोक बेरोजगार होतील त्यामुळे याचा गांभिर्याने विचार करावा.

मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचा पंचनामा करताना प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका सामुदायिक आधार मंडळ (CBO) तत्वावर शौचालयाची देखभाल करण्याचे काम देत असते. धारावी भागातील १५० शौचालयांना नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. शौचालये देताना ५ वर्षांचा करार झालेला आहे, कोणाचीही तक्रार नसताना तत्कालीन वार्ड ऑफिसर व माजी नगरसेवकाची सही असलेली पत्रे देण्यात आली आहेत, ही कुठली नवी परंपरा महापालिकेने आणली आहे ? वार्ड ऑफिसरची सही समजू शकतो पण जो दोन वर्षापासून नगरसेवकच नाही त्याची सही कशी? ज्या अधिकाऱ्याची तीनवेळा बदली केली जाते तो पुन्हा तेथे कामावर कसा जातो, हे गांभियार्नाने घ्यावे व चौकशीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *