images

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी;

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन करण्याचे ध्येय राज्यातील महायुती सरकारने निश्चित केले असून, मायबाप शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्याच्या एकूण बजेटच्या ४२ टक्के भाग ठेवण्यात आला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय देणारा कल्पक आणि लोकाभिमुख असा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रीया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

बावनकुळे म्हणाले की, सिंचन, जलयुक्त शिवार योजनेतून हिरवीगार शेती, ३६ हजार नवे रोजगार, लघु उद्योगाला प्रोत्साहन, तीर्थक्षेत्र विकास, भरीव ऊर्जा निर्मिती,बेळगाव येथे मराठी भाषा उपकेंद्र, अयोध्येत महाराष्ट्र भवन, दिव्यांग विकासासाठी योजना, ड्रोन मिशन, स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तवेतनात दुप्पट वाढ, पोलिसांसाठी योजना, सर्वच तालुक्यात डायलीसिस केंद्रे, महिलांसाठी पिंक रिक्षा, नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा, राज्यात पायाभूत सुविधा, विमातळाचे विस्ताऱीकरण आणि रेल्वेचे जाळे मजबूत करण्याचा संकल्प सरकारने सोडला असून, यामुळे महाराष्ट्र गतिमान प्रगतीकडे नक्कीच वाटचाल करेन असा विश्वास मला आहे.

आज सादर झालेला अर्थसंकल्प राज्याच्या विकासाची बीजे मजबूत करणारा आहे. संशोधन, आरोग्य, कृषी, आदिवासी याच्या विकासावर भर दिला आहे. यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अर्थ मंत्री व उपमुख्यमंत्री  अजित पवार यांचे अभिनंदन करतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *