राजभवनच्या अंगणात वारंवार जाण्यापेक्षा भाजपाने स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी!: बाळासाहेब थोरात

0
BalasahebThorat

महाविकास आघाडीचे सरकार कोरोनाचा संकटाचा खंबीरपणे सामना करत असताना राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी आटापीटा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आज हसे झाले असून वारंवार राजभवनच्या अंगणात जाण्याची सवय लागलेल्या भाजपा नेत्यांनी आतातरी स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी, असा घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

भाजपाच्या आंदोलनाचा समाचार घेताना थोरात पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संकटात राजकारण न करता सहकार्याची भूमिका घ्या, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्ष नेत्यांनी साथच दिली पण मोदींच्या पक्षाचे राज्यातील नेतेच त्यांच्या आवाहनाला बगल देत महाराष्ट्रात राजकारण करण्यात आकंठ बुडालेले आहेत. सत्ता गेल्याने राज्यातील भाजपाचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून सत्तेसाठी त्यांची तडफड होतेय. विरोधी पक्षाने कोरोनाच्या संकटात सरकाला काही विधायक सूचना केल्या तर त्यांचे स्वागतच केले जाईल परंतु त्यांना राजकारणच करायचे असल्याने राजभवनाच्या फेऱ्या मारून आता त्यांनी घरच्या अंगणालाच रणांगण केले आहे. चंद्रकांतदादा पाटील यांचे खरे आंगण कोणते ?  देवेंद्र फडणवीस तरी त्यांच्या नागपूरला गेले का? त्यांच्या अंगणात काँग्रेसचे कार्यकर्तेच मदत करत आहेत. तसेच त्यांचा हा डाव पुर्णपणे फसला असून या आंदोलनाचा बार फुसका ठरला आहे. या आंदोलनाला प्रतिसाद मिळला नाही, अनेक ठिकाणी लहान मुलांना आंदोलनासाठी वेठीस धरण्यात आल्याचे चित्र होते.

संकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनवणे हे कुठले शहाणपण? राजकारणासाठी आयुष्य पडले आहे, आजची वेळ निर्धाराने आणि एकजुटीने लढण्याची आहे. इतिहास भाजपाची आजही ही काळी कृती कधीही विसरणार नाही. कोरोनाच्या लढाईत सर्व सरकारी यंत्रणा, डॉक्टर, नर्स, पोलीस दल, सफाई कामगार यांच्यासह विविध क्षत्रातले लोक जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपले योगदान देत असताना काळ्या फिती लावून आंदोलन करुन भारतीय जनता पक्षाने या योद्ध्यांचा अपमानच केला आहे, असे थोरात म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *