‘तो’ अहवाल सार्वजनिक करा व दोन तासात अध्यादेश काढा..
लोणावळा, दि. १६ फेब्रुवारी:
राज्य सरकारने मागीसवर्गीय आयोगाचा अहवाल आत्ताच्या आता एका तासात वेबसाईटवर टाकून सार्वजनिक करावा आणि दोन तासाच्या आत अध्यादेश काढावा. अध्यादेश काढण्यास अधिवेशनाची गरज नाही तो पास करण्यास अधिवेशन लागते. आयोगाच्या अहवालात काय आहे महाराष्ट्राच्या जनतेला व जरांगे पाटील यांनाही कळले पाहिजे, त्यासाठी दोन दिवसांची वाट पाहण्याची गरज काय ? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
मराठा आरक्षणावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे व मनोज जरांगे पाटील यांची बोलणी झाली, उपोषण सोडले, गुलाल उधळला व प्रश्न सुटला असे सांगितले मग पुन्हा उपोषण करण्याची गरज काय पडली याची उत्तरे दिली पाहिजेत. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत महत्वाची आहे, त्यांच्या प्रकृत्तीला काय झाले तर जबाबदार कोण? असेही चव्हाण म्हणाले.
