शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र घडवू..

0
IMG-20240212-WA0136

मुंबई, दि. १३ फेब्रुवारी –

राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु असेल, शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक असेल ही सगळी भूमिका पार पाडली असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार स्वराज्य सप्ताह शुभारंभप्रसंगी म्हणाले..

ज्या जिजाऊंनी जन्माला घातले त्यांनी त्यांना वाढवलं…त्यांच्यावर संस्कार केले…. चांगले सल्ले दिले… त्यांना घडवण्याचे काम जिजाऊंनी केले ही बाब ध्यानात घ्या…छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून अवघ्या महाराष्ट्राला स्वाभिमान… अस्मिता… लढावू बाणा आणि स्वराज्याची प्रेरणा दिली असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज आपले अभिमान आणि स्वाभिमान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी करुन स्वतःचे आरमार…जलदूर्ग उभारले त्यांच्या कार्यप्रेरणेतूनच गेली चार दशके महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या पराक्रमाची पताका सर्वदूर फडकत असताना आपण पहात आहोत असेही अजित पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील दुर्गम डोंगरदऱ्या कडेकपारीमध्ये अठरापगड जातीला… मावळ्यांना… बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांच्यात स्वराज्य निर्मितीची चेतना जागवून ख-या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण केले. आपल्याला महाराजांच्या विचारांवर वाटचाल करायची आहे असे मार्गदर्शनही अजित पवार यांनी केले.

सर्वांचा आदर करायला शिकवणारा राजा अशी महाराजांची ओळख आहे. अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले… स्वाभिमानाने जगायला शिकवले… काळ्या आईची सेवा करायला शिकवले… प्रत्येक माताभगिनींचा मानसन्मान शिकवला… अडचणीत असलेल्यांना मदत करायला शिकवले… आपल्या देशावर… राज्यावर आपल्या मातीवर प्रेम करायला शिकवले… याची काळजी घ्यायला शिकवले… आपल्या धर्माचा अभिमान बाळगताना दुसर्‍या धर्माचा आदर सन्मान करायची शिकवण दिली… पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत जगलेल्या अंधारात चाचपडणार्‍या समाजाला स्वाभिमानाने जगायला शिकवले… लढायला आणि आत्मविश्वासाने उभं करायला शिकवले असेही अजित पवार यांनी सांगितले.

आपल्याला महाराजांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र घडवायचा आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश त्याकाळात साडेतीनशे वर्षापूर्वी देणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. जागतिक दर्जाचे एक मॅनेजमेंट गुरू असू शकतात याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला तर त्यांच्या व्यक्तीमत्वाचा पैलू आपल्याला पहायला मिळतात. रयतेची काळजी घेणारा एक महान राजा म्हणून ओळख आहे. शिवाजी महाराज भोगवादी राजा नव्हे तर खरे रयतेचे राजे होते शेतकऱ्यांचे कैवारी… कलावंताचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात कृतीत आणली असेही अजित पवार मार्गदर्शन करताना म्हणाले.

महाराजाच्या विचारांवर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुया आपल्या महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवण्यासाठी एकजूटीने… एकदिलाने काम करुया असे आवाहनही अजित पवार यांनी

स्वराज्य सप्ताहाचा शुभारंभ गेटवे ऑफ इंडिया येथे झाला. गेटवे ऑफ इंडिया येथे आगमन होताच राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाला अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *