एका नेत्यामुळे अशोक चव्हाणांनी पक्ष सोडला !

0
images (53)

मुंबई, दि. १२ फेब्रुवारी:

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर स्वाभाविकपणे त्याच्या प्रतिक्रिया उमटणारच होत्या. आगे आगे देखो होता है क्या असे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले असताना चव्हाण भाजपात आले तर स्वागतच अशाही प्रतिक्रीया आली आहे. परंतु काँग्रेस पक्षातून एक महत्वाची प्रतिक्रीय आली आहे.

काँग्रेसचे माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलताना म्हटले आहे की, “अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षासाठी महत्वाचे नेते होते, मास लिडर असलेले, कुशल संघटक व अनुभवी नेते होते. मागील वर्षीच्या भारत जोडो यात्रेत नांदेड जिल्ह्यातील त्यांनी केलेले व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध व वाखाणण्याजोगे होते. त्याची प्रशंसाही करण्यात आली होती. अशोक चव्हाण हे राज्यातील एक नेत्याच्या कार्यशैलीवर प्रचंड नाराज होते, यासंदर्भात त्यांनी सातत्याने हायकमांडशी चर्चा केली होती पण त्यावर काहीच हालचाल झाली म्हणून शेवटी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षासाठी हे मोठे नुकसान आहे”, असे निरुपम म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *